बीएसएफ जवानांच्या ट्रकला अपघात; एका जवानाचा मृत्यू, 12हून अधिक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर कर्तव्यासाठी जाणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या ट्रकला अपघात झाला आहे. या अपघातात एक बीएसएफ जवानाचा मृत्यू झाला असून 12हून अधिक जण जखमी झाले आहेत. जैसलमेरच्या लंगतला येथे हा अपघात घडला.

या अपघातात बळी पडलेला जवान बिहारचा आहे. जखमींना जैसलमेरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेर बीएसएफची 149वी बटालियन आपल्या कर्तव्यासाठी सीमेवर जात होता. त्यात जवानांसाठी रसदही भरण्यात आली होती. ट्रक जैसलमेरपासून सुमारे 150 किमीवर असलेल्या सीमाभागातील लंगतला येथे पोहोचला. त्या दरम्यान समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देत असताना ट्रक पलटला आणि अपघात झाला.

या अपघातात 12 हून अधिक जवान जखमी झाले, त्यातील एका जवानाचा मृत्यू झाला आहे. त्यांचं नाव संजय कुमार दुबे असं आहे. ते बिहारचे रहिवासी आहेत. त्यांची पोस्टिंग 149व्या बटालियनमध्ये झाली होती.