नाल्यात आढळला 3 वर्षीय मुलाचा मृतदेह, कुटुंबाने शाळेची इमारत पेटवली

tiny-tot-Academy

पाटणा येथील एका खासगी शाळेत शुक्रवारी एका 3 वर्षाच्या मुलाचा मृतदेह नाल्यात सापडला होता, त्यानंतर संतप्त झालेल्या त्याच्या कुटुंबीयांनी शाळेच्या इमारतीला आग लावली.

मृत मुलाच्या संतप्त कुटुंबाने रस्ते अडवले, वाहनांची वाहतूक विस्कळीत केली आणि रस्त्यावर टायर जाळले.

मुलगा शाळेतून घरी न परतल्यानं कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला होता. त्यांनी मुलाचा ठावठिकाणा विचारला, पण तो घरी परतल्याचं शाळेनं सांगितलं.

कुटुंबानं त्यांचा शोध सुरू ठेवला, अखेरीस त्यांना मुलाचा मृतदेह सापडला. शाळेच्या आवारात खोलवर, ड्रेनेज गटारमध्ये लपलेल्या तीन वर्षांच्या मुलाचा मृतदेह त्यांना आढळला.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, ‘काल मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानंतर तपास करण्यात आला आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. असे आढळून आले की, मूल शाळेच्या आत गेले होते, परंतु बाहेर आले नाही. तपासादरम्यान, शाळेतील दोन मुलांनी कबूल केलं की मुलाचा मृतदेह शाळेतील गटारात ठेवला होता’.

पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना ताब्यात घेतलं आहे.