आष्टीत बिबट्याच्या हल्ल्यात 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

leopard

आष्टी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात 11 वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलावर बिबटयाने हल्ला करत त्याला उचलून दूर नेले. बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला आहे. आष्टी तालुक्यातील किन्ही येथे ही घटना घडली असून स्वराज्य सुनिल भापकर असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्याची एकाच आठवडयातील ही दुसरी घटना आहे.

स्वराज्य भापकर श्रीगोंदा तालुक्यातील भापकर वाडी येथील राहणारा असून तो दिवाळीच्या सुटीत किन्ही येथे आपल्या आजीकडे आला होता. नातेवाईकांसोबत तुरीला पाणी देण्यासाठी शेतात जात असताना अचानक बिबटयाने स्वराज्यवर झडप घातली आणि त्याला दूर नेले. त्यात स्वराजचा मृत्यू झाला आहे.

किन्ही गावापासून 7 कि.मी. अंतरावर असलेल्या सुरुडी गावातील पंचायत समिती सदस्याच्या पतीवर बिबट्याने दोन दिवसांपूर्वी हल्ला केला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला. एकाच आठवडयातील ही दुसरी घटना असल्याने बिबटयाची तालुक्यात दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तात्काळ बिबटयाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या