व्हिडिओ: टीम इंडिया पराभूत , ती प्रेमी जोडी मात्र जिंकली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | लंडन

टीम इंडिया आणि हिंदुस्थानी चाहत्यांसाठी लॉर्ड्सवरचा शनिवारचा वनडे सामना तसा निराशाजनकच ठरला. पण या लढतीला उपस्थित एका हिंदुस्थानी प्रेमी युगुलासाठी मात्र हि लढत संस्मरणीय ठरली. हा सामना सुरु असताना पवन बेन्स नामक हिंदुस्थानी युवकाने आपली प्रेयसी चरण गिल हिला चक्क गुडघ्यावर बसून प्रपोज केले. चरणने थोडा वेळ विचार केला आणि पवनचा लग्नाचा प्रस्ताव स्वीकारत त्याला आलिंगनही दिले. या आगळ्या प्रपोजचे उत्स्फूर्त स्वागत करीत उपस्थित क्रिकेटशौकिनांनाही जोरदार टाळ्या वाजवत पवन-चरण जोडीला शुभेच्छा दिल्या. नेमके याच वेळी हिंदुस्थानी फिरकीवीर युझवेन्द्र चहल मैदानात टाळ्या वाजवताना व्हिडीओ क्लीपमध्ये दिसला. पवनने याच प्रसंगी चरणला अंगठीही घातली. पराभूत हिंदुस्थानी संघाने उपस्थित चाहत्यांना निराश केले. पण पवन-चरण जोडीच्या प्रपोज सोहळ्याने मात्र या चाहत्यांची मने जिंकली.

प्रेनी युगुलांचे विवाहासाठी मनोमिलन ही ऐतिहासिक लॉर्ड्ससाठी नवी घटना नाहीय. याआधी गेल्या वर्षी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने कारकिर्दीतील ५०० विकेट्स पूर्ण केल्यावर लॉर्ड्सवर अशाच एका जोडप्याने एकमेकांना प्रपोज केले होते.