मालगाडीच्या इंजिनमध्ये फसूनही चिमुकला बचावला

दिल्लीनजीकच्या फरिदाबादमध्ये रेल्वे ट्रॅकवर फिरणारा दोन वर्षीय मुलगा मालगाडीच्या लोको इंजिनाच्या पुढच्या भागात फसूनही आश्चर्यकारकरीत्या बचावला. मालगाडीचे चालक दिवाण सिंह यांनी वेळीच ब्रेक लावल्याने इंजिन थांबले, पण टॅकवरचा मुलगा इंजिनाच्या भागात अडकला. त्यानंतर उपस्थित नागरिक आणि रेल्वे कर्मचाऱयांनी मोठय़ा चातुर्याने त्या मुलाला सुरक्षित बाहेर काढले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. बुधवारी या अपघातग्रस्त मुलाच्या 12 वर्षीय भावाने या चिमुकल्याला मालगाडी येतेय ते पाहून ट्रकवर सोडले होते. पण रेल्वे मोटरमनने समयसूचकतेने रेल्वे इंजिन वेळीच थांबवल्याने चिमुकल्याचे प्राण वाचले. या प्रकरणी रेल्वे चालक दिवाण सिंह यांनी तक्रार दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या