
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्या आगामी लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटाची सध्या चर्चा आहे. तब्बल 4 वर्षांनी आमिर खान मोठ्या पडद्यावर दिसणार असल्याने त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच याविरोधात वातावारण तयार झाल्याने बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
आमिर खान (Aamir Khan) आणि करीना कपूर-खानची (Kareena Kapoor) प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट 11 ऑगस्टला देशभरामध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाला अवघे दहा दिवस बाकी असताना सोशल मीडियावर बॉयकॉट Laal Singh Chaddha ट्रेंड सुरू झाला आहे. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ची कॉपी असून याला हिंदीमध्ये रिमेंक करण्यात आले आहे. अर्थात चित्रपट कॉपी असल्यानेच याला विरोध होत नसून यामागे अन्यही काही कारणे आहेत.
आमिर खानसह करीना कपूर खान हिने गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या वक्तव्याचाही यामागे हात आहे. आमिर खान याची पत्नी किरण राव हिने हिंदुस्थानमध्ये राहणे सुरक्षित वाटत नाही असे म्हटले होते, तर करीना कपूरने आमचे चित्रपट पाहू नका, तुम्हाला कोणी फोर्स करत नाही असे म्हटले होते. या दोन्ही वक्तव्यांचा दाखला देत नेटकऱ्यांनी हा चित्रपट बॉयकॉट करण्याचे आवाहन केले आहे. तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये हिंदू धर्म, संस्कृतीची खिल्ली उडवल्याचा प्रकारही समोर आल्याचे म्हणत नेटकऱ्यांनी या चित्रपटाला विरोध केला आहे.
Boycott pic.twitter.com/hYUDVoWE28
— Rahul Mishra (@RahulMi93641356) August 1, 2022
I appeal all NATIONALIST to boycott #AamirKhan & #KareenaKapoorKhan starter #LaalSinghChaddhaTrailer during IPL to gather views from public
Let’s ensure HOLLYWOOD copied #LaalSinghChaddha with Indian name change can’t even enter 100Cr club #BoycottBollywood pic.twitter.com/RB0GAXpCYn
— Nitika Singh (@itsNitikaSingh) May 29, 2022
एका युजरने तुझ्या पत्नीला हिंदुस्थानात राहणे सुरक्षित वाटत नाही तर तुझे चित्रपट येथे प्रदर्शित का करतो? असा रोकडा सवाल आमिरला केला. तसेच अन्य एका युजरने आमिर खान याने काही वर्षांपूर्वी शिवलिंगावर दूग्धाभिषेक करण्याला विरोध केला होता असे म्हणत आता आम्हीही बॉलिवूड चित्रपट पाहण्याऐवजी ते पैसे गरिबाला देऊ असे म्हटले. काहींनी लाल सिंह चड्ढा पाहण्याऐवजी ओरिजनल चित्रपट फॉरेस्ट गंप पहा असेही आवाहन केले.
#BoycottLaalSinghChaddha#LalSinghChaddha movie budget is 180cr…
Dear Hindus, make sure it won’t earn 80cr at box-office… Make it a super flop so that next time Amir thinks twice to insult Hindu Gods….#hindutvawarriors pic.twitter.com/9ANOXmRkmU
— Bhaskar (@Bhaskar50073804) July 31, 2022
As your wife said you are not safe in India why are you telecasting your film here.#BoycottLaalSinghChaddha #BoycottLaalSinghChaddha pic.twitter.com/iWtLuNtMZO
— Uday Nanda 005 (@UdayNanda4) August 1, 2022
Boycott #LaalSinghChaddha If you want to save your dharma.
RT if you agree?#AamirKhan pic.twitter.com/e8jDsLmp0U
— #अक्षय Dn 3 Proud Hindu (@daniak_shay_45) July 18, 2022
#BoycottLaalSinghChaddha#BoycottbollywoodForever#PushpaTheRule #pushpa #LalSinghChaddha#BoycottBollywood ❌
Difference between #Bollywood & South Indian Cinema.
SHAME ON YOU #Bollywood
#AlluArjun #AamirKhan pic.twitter.com/jKMOflXPAK— ℝ (@Boss42265174) July 31, 2022





























































