
महाराष्ट्राच्या मुलांनी सलामीच्या लढतीत नागालॅण्ड संघावर 32-6 असा एक डाव राखून 26 गुणांनी दणदणीत विजय साकारला. ओडिशा, भुवनेश्वर येथील बिजू पटनायक इनडोअर स्टेडियममध्ये कुमार-मुली राष्ट्रीय खो-खो स्पर्धा सुरू आहे. याप्रसंगी मुलींचा नागालॅण्ड संघ न आल्यामुळे महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला पुढे चाल देण्यात आली.
सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात महाराष्ट्राकडून सूरज जोहरे, विवेक ब्राह्मणे व भगतसिंग वसावे यांनी प्रत्येकी 5 गडी टिपत महाराष्ट्रचा विजय सोपा केला. भगतसिंगने नाबाद 1.50 तर सौरभ अहिरने 2.30 मिनिटे संरक्षण करून विजयाची पायाभरणी केली. रवी वसावे (1.20 मिनिटे संरक्षण व 2 गडी) व आदित्य कुदळे (1.30 मिनिटे संरक्षण व 4 गडी) यांनी अष्टपैलू खेळ करताना मोठा विजय साजरा केला.



























































