तीन अॅपद्वारे हिंदुस्थानची गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवली

देशातील सुरक्षेशी संबंधित गोपनीय माहिती दुसऱया देशांना दिल्याच्या आरोपाखाली तुरुंगात कैद असलेल्या ब्राह्मोसचा माजी वैज्ञानिक निशांत अग्रवाल प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. उत्तर प्रदेशातील एटीएस पथकाच्या तपासात अधिकारी पंकज अवस्थी यांनी न्यायालयाला सांगितले की, तीन ऍपद्वारे हिंदुस्थानची गोपनीय माहिती पाकिस्तानकडे गेली. पाकिस्तानी महिला सेजलने निशांतला 2017 मध्ये एक लिंक पाठवली. निशांतने या लिंकवर क्लिक करताच सेजलने निशांतच्या खासगी लॅपटॉपमध्ये व्यूव्हिस्पर, चॅट टू हायर आणि एक्स-ट्रस्ट हे तीन ऍप इन्स्टॉल केले. या ऍपच्या माध्यमातून निशांतच्या लॅपटॉपमधील हिंदुस्थानच्या सुरक्षेशी निगडित गोपनीय माहिती चोरण्यात आली.