
तंत्रज्ञानाच्या या युगात जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. मानवाच्या मेंदूत छिद्र करून लावली जाणारी कॉम्प्युटर चीप तयार करण्याची घोषणा टेस्ला, स्पेसएक्स कंपन्यांचे मालक एलन मस्क यांनी नुकतीच केली आहे. या चीपच्या माध्यमातून मानवी मेंदू थेट कॉम्प्युटरशी जोडला जाईल. सारं काही नियोजित वेळेत पार पडलं तर न्यूरालिंक नावाने सुरू केलेल्या ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस स्टार्टअपची मानवी चाचणी या वर्षाच्या शेवटी सुरू होईल. यापूर्वी प्राण्यांवर चीपची चाचणी करण्यात आली आहे.
न्यूरोलॉजिकल समस्यांपासून होणार सुटका
मस्क यांनी 2016 साली या स्टार्टअपची सुरुवात प्रान्सिस्को बे एरियामध्ये केली होती. याद्वारे अल्झायमर, डिमेंशिया आणि पाठीच्या कण्याच्या दुखापती यासारख्या न्यूरोलॉजिकल समस्यांवरील उपचारासाठी मदत होणार आहे. त्यासाठी मानवाच्या मेंदूत एक कॉम्प्युटर इंटरफेसला प्रत्योरोपित करण्याचे उद्दिष्टय़ आहे.
ट्विटला उत्तर देताना दिली माहिती
एलन मस्क यांनी यांनी ही माहिती एका ट्विटला उत्तर देताना दिली आहे. या व्यक्तीने मानवी चाचणीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली होती. युजरने ट्विट केलं होतं की, 20 कर्षांपूर्की एका कार अपघातात माझ्या खांद्याखालील भागाला अर्धांगवायूचा झटका आला आहे. आता मी तुमच्या न्यूरालिंक क्लिनिकल ट्रायलसाठी उपस्थित राहणार असल्याचे त्याने सांगितले. त्यावर उत्तर देताना एका वर्षाच्या आत मानवी चाचणीला सुरुवात होणार असल्याचे मस्क यांनी सांगितले.



























































