केरळमध्ये हाय अलर्ट, ‘मेंदू खाणाऱ्या अमिबा’ने घेतला 19 जणांचा जीव

केरळमध्ये सध्या एका विचित्र आजाराने डोकं वर काढलं आहे. या प्राथमिक अमीबिक मेनिन्गोएन्सेफलायटीस असे त्या आजाराचे नाव असून याला Brain-Eating Amoeba (मेंदू खाणारा अमिबा) असेही म्हटले जात आहे. आतापर्यंत 65 जणांना या आजाराची लागण झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी बरेच मृत्यू हे गेल्या आठवडाभरातील आहेत. अचानक या मृत्यूमध्ये झालेल्या वाढीनंतर केरळच्या आरोग्यमंत्रालयाने हाय अलर्ट जारी केला आहे.

केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी याबाबत सांगताना म्हटले की या संसर्गाची सर्वाधिक लागण ही कोझिकोड व मलप्पुरम जिल्ह्यातील गावांमध्ये झाली आहे. सुरुवातीला या दोन जिल्ह्यातच रुग्ण आढळून आले होते. मात्र आता राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णा आढळून येत आहेत. संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये तीन महिन्याच्या बाळाचा देखील समावेश आहे. हा आजार पाण्यातून पसरत असल्याची देखील शक्यता आहे.