Breaking News : लॉकडाऊन संदर्भात अजित पवार यांची सभागृहात महत्त्वाची माहिती, आमदारांनाही झापलं

deputy-cm-ajit-pawar

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेश सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधले. जगभरात धुमाकूळ घालणारा आणि देशात वाढत जाणारी ओमायक्रॉनग्रस्तांची रुग्ण संख्या हे लक्षात घेता त्यांनी सभागृहातील आमदारांचे कान टोचले. तसेच लॉकडाऊन संदर्भातही त्यांनी उल्लेख केला.

अजित पवार हे सभागृहात म्हणाले, अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातून सभागृहाला लक्षात आणू देऊ इच्छितो काल पासून आपलं अधिवेशन सुरू झालं आहे. आपण इथे बसलेले लोकप्रतिनिधी तीन-चार लाख लोकांचे प्रतिनिधित्व करत असतो. स्वत: देशाचे पंतप्रधान देखील जे कोरानाचे संकट आहे त्यासंदर्भात गांभिर्याने विचार करताहेत ज्यामध्ये रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरिष्ठ पातळीवर, देशपातळीवर चालली आहे. मात्र इथे काही ठराविकजण सोडले तर अजिबात इथे कोणी मास्क लावत नाही. संपूर्ण महाराष्ट्र इथे काय चाललं आहे ते बघतो आहे. जर आम्हीच कुणी मास्क लावले नसेल तर ते कसे. मी मास्क लावून बोलतो, काहींना अडचण असेल तर त्यांनी बोलण्यापुरता मास्क काढावे. पण त्यानंतर पुन्हा मास्क लावू शकतो.’

परदेशातील परिस्थिती देखील त्यांनी यावेळी मांडली. ‘परदेशातील परिस्थिती इथल्या अनेकांना माहित नाही. दीड दिवसाला दुप्पट पेशंटची संख्या वाढत आहे. WHO परदेशात 5 लाख लोकं मृत्युमुखी पडतील असे सांगितले आहे. आपल्या देशाचे आणि महाराष्ट्राचे काय. काही काही गोष्टी ज्या त्यावेळीच त्याचे गांभिर्य लक्षात घेतल्या पाहिजे. मास्क लावले नसेल तर त्यांना बाहेर काढा. मी मास्क लावले नसेल तर मलाही बाहेर काढा. पण या गोष्टीचे गांभिर्य पाळा. विरोधीपक्ष आणि सर्वांनाच माझी विनंती आहे की, आपण बाहेर बघतो व्हिडीओ, बातम्या लगेच चॅनेलवर जातात. आता नविन विषाणूचे नविन रुप पुढे आले आहे. तेव्हा गांभिर्य ठेवा अशी विनंती,’ अशी विनंती त्यांनी केली.

त्यांच्या विनंतीनंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी सर्वांनी मास्क लावण्यास सांगितले. बोलण्यापुरता मास्क बाजूला केलं तर चालेल मात्र इतरवेळी मास्क लावा, असे विधानसभा अध्यक्षांनी सांगितले.