ब्रायन लाराला डिस्चार्ज

सामना प्रतिनिधी । मुंबई

वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा याला आज दुपारी परळच्या ग्लोबल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. छातीत दुखू लागल्याने मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ग्लोबल रुग्णालयातील हृदयरोगतज्ञ डॉ. प्रवीण कुलकर्णी यांनी लारा याच्यावर अँजियोग्राफी केली आहे. अँजियोग्राफीनंतर लाराला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले होते. वेस्ट इंडीज क्रिकेटच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून ट्विट करण्यात आले असून ब्रायन लाराची तब्येत उत्तम असल्याचे कळवले आहे. शिवाय त्याची प्रकृती सुधारत असल्याचेही म्हटले आहे.