भरमांडवातच नवरीने मारले पुशअप्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोशल मीडियात लग्न सोहळ्यामधील अनेक गमतीदार व्हिडिओ व्हायरल होतात. युजर्सलाही ते खूप आवडतात. लग्नसोहळा म्हटलं की त्यात नवरी मुलगी अगदी शांतपणे बसलेली आणि लाजत असल्याचे आपण नेहमी पाहतो. पण एखाद्या नवरीला भरमांडवात पुशअप्स मारताना कधी पाहिले आहे का…पण हे खरे आहे.

सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात नवरीने लाल रंगाचा लेहेंगा आणि दागिने परिधान केल्याचे दिसत आहेत. सर्वजण तिच्या सौंदर्याचे काwतुक करत आहेत. तेवढय़ातच नवरीने भरमंडपात एकामागोमाग एक पुशअप्स काढले. त्यानंतर ती मसल्स दाखवते. नवरीला पुशअप्स काढताना पाहून पाहुणेमंडळी हैराण झाली. तिची शरीरयष्टी पाहून ती नक्कीच बॉडी बिल्डर असावी असा अंदाज अनेकांनी वर्तवला आहे. अनेकांनी एक्सरसाइजबाबत असलेल्या तिच्या व्रेझचे कौतुक केले आहे.