मानेचा काळेपणा दूर करा!

चेहरा कितीही उजळ, आकर्षक असेल आणि मान काळी असेल तर सौंदर्यात बाधा येते. खोट्या दागिन्यांच्या अॅलर्जीमुळे, उन्हामुळे तसेच मानेच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने मान काळी पडू शकते, मात्र काही घरगुती उपयांनी ही समस्या सोडवता येऊ शकते.

– दोन चमचे बेकिंग पावडर पाण्यात मिसळून पेस्ट बनवून मानेला लावा. नंतर मसाज करा.

– मान दररोज लिंबाने चोळून घासली की काही दिवसांनी मानेवरचा काळपटपणा दूर होऊन उजळपणा वाढेल.

– कच्चा बटाटा किसून मानेवर लावा.

– किसलेल्या बटाट्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून मानेवर लावा आणि 15 ते 20 मिनिटांनी मान गार पाण्याने धुवा.

– टोमॅटो आणि दही एकत्र करून बनवलेला पॅक मानेला चोळा. काही वेळाने मान स्वच्छा धुवा.

– साखरेने 15 मिनिटे मानेला मसाज करा. नंतर गार पाण्याने मान धुवा.

– टोमॅटोमुळे त्वचा स्वच्छ होऊन त्वचेचा रंग उजळतो. नियमित टोमॅटो कापून मानेवर घासल्याने मानेची त्वचा चमकदार व्हायला मदत होईल.

– कोरफडीचा रस मानेवर लावा. अर्धा तास तसाच राहू द्या. नंतर पाण्याने मान धुवा. हा उपाय दररोज करा.

– एक चमचा पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा मिसळा. ही पेस्ट मानेवर लावा. हा पॅक सुकल्यानंतर पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून दोनदा असे केल्याने फरक जाणवेल.

– कच्च्या पपईचा गर, गुलाबपाणी आणि दही यांची पेस्ट करून ती मानेवर लावा. सुकल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.

– हळदीचे कच्चे दूध मिसळा आणि मानेवर लावा.

– चंदन पावडरमध्ये लिंबाचा रस आणि गुलाबपाणी घालून पेस्ट बनवा. मानेवर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा.

– सुकवलेल्या संत्र्याच्या सालीची पावडर करा. यात दही घालून पेस्ट करा आणि ती मानेवर लावा.

– लिंबू अर्धे कापून घ्या. त्यावर साखर घालून काळवंडलेल्या मानेवर चोळा. यामुळे मानेची काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होईल.

 

आपली प्रतिक्रिया द्या