ब्रिटनने उभारली नवीन गोरखा रेजिमेंट, हिंदुस्थानात भरतीवरून सुरू असलेला तिढा कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानातील अतिशय आक्रमक, लढाऊ आणि कणखर शरीरयष्टी म्हणून गोरख रेजिमेंटची ओळख आहे. मात्र हिंदुस्थानच्या सैन्यात नेपाळी गोरखांच्या भरतीवरून सुरू असलेला तिढा अद्याप कायम आहे. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनने नेपाळी गोरखांना आपल्या सैन्यात समाविष्ट करून एक नवीन रेजिमेंट तयार केली आहे. ब्रिटिशसम्राट किंग चार्ल्स (तिसरे) यांच्या नेतृत्वाखाली या रेजिमेंटला ‘किंग्स गोरखा आर्टिलरी’ (केजीए) असे नाव देण्यात आले आहे. या युनिटच्या पहिल्या बॅचमधील 20 निवडक सैनिकांचा शपथविधी सोहळा नुकताच दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील लार्कहिल पॅम्पमध्ये पार पडला.

ब्रिटिश सैन्यात भरती झालेल्या नवीन गोरखा सैनिकांना त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विविध मोहिमांवर तैनात केल्या जाणार आहेत. हे सैनिक युनायटेड किंगडम आणि परदेशात आयोजित केल्या जाणाऱ्या युद्ध सराव आणि लष्करी मोहिमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत.