रिकाम्या पोटी कोणताही निर्णय घेऊ नका! आधी हे वाचा..

1538

आजच्या या धावपळीच्या जगात आपण कोणते ही काम असो वा निर्णय घाईघाई घेतो. अशातच आपण अनेक वेळा भुकेच्या तडाख्यात अनेक निर्णय घेऊन जातो, ज्यावर नंतर आपल्याला पश्चाताप होतो. ब्रिटनमधील एका नवीन संशोधनात असे आढळले आहे की, एकदा व्यवहार किंवा एकदा निर्णय घेताना आपल्याला भूक लागली असेल तर आपण चुकीचा निर्णय घेऊ शकतो. ब्रिटनमधील University of Dundee ने या संदर्भात 50 लोकांवर संशोधन केले आहे. यात सहभागी झालेल्या बहुतेक व्यक्ती हे 21 वयोगटातील होते. या प्रयोगात सहभागी झालेल्या व्यक्तींना प्रयोगाच्या दोन तास आधी खायला दिल्यानंतर त्यांना अन्न, पैसे आणि इतर महत्त्वाच्या गोष्टीवर प्रश्न विचारण्यात आले. याच संदर्भात त्यांना पुन्हा 10 तासांनी प्रश्न विचारण्यात आले. या 10 तासात त्यांनी काहीही खाल्ले नव्हते.

या संशोधनातून असे समजून आले की, जेव्हा सहभागी भुकेले होते तेव्हा त्यांनी असे निर्णय घेतले ज्यामुळे त्यांना कमी कालावधीत अधिक फायदा मिळू शकेल आणि त्यांना बराच काळानंतर मिळणाऱ्या फायद्याची काहीही चिंता नव्हती. संशोधकांना असे आढळले की जेव्हा लोकांना त्यांना आता मिळाणाऱ्या फायदाच्या दुप्पट फायदा देण्याचे वचन देण्यात आले. तेव्हा त्यांनी त्यासाठी जास्तीस्त जास्त 35 दिवस प्रतीक्षा करू शकणार असल्याचे सांगितले. मात्र हाच प्रश्न त्यांना उपाशी पोटी विचारण्यात आला तेव्हा त्यांनी फक्त तीन दिवस प्रतीक्षा करणार असल्याचे सांगितले.

या संशोधनातील मुख्य संशोधक डॉ. बेंजामिन व्हिन्सेंट म्हणाले, “लोकांना सहसा माहीत असते की जेव्हा ते भुकेले असतात तेव्हा त्यांनी अन्नासाठी खरेदी करायला जाऊ नये. कारण या काळात ते चुकीचा निर्णय घेतील आणि आरोग्याला योग्य नसलेले पदार्थही खाऊ शकतात. आमच्या संशोधनानुसार उपासमारीचा इतर सर्व निर्णयांवरही परिणाम होऊ शकतो. समजा तुम्ही पेन्शन किंवा इतर आर्थिक सल्लागाराशी बोलणार जाणार असाल आणि त्यावेळी जर तुम्ही उपाशी असाल तर तुम्ही लवकरात लवकर होणाऱ्या फायद्यांकडे अधिक लक्ष द्याल आणि भविष्याबद्दल जास्त काळजी करणार नाही. हे परिणाम मानसशास्त्र आणि आर्थिक व्यवहारात अत्यंत महत्त्वपूर्ण असू शकतात या संशोधनाच्या परिणामामुळे लोकांना उपासमारीच्या दुष्परिणामांची जाणीव होऊ शकते. उपासमारीमुळे निर्णय घेण्याच्या त्यांच्या क्षमतेवर रिणाम होतो हे त्यांना कळू शकेल.

संशोधनाच्या परिणामानुसार, भूक लोकांची आवड-निवड देखील बदलू शकते. लोकांना स्वतःला हे देखील माहीत नसते की भूक त्यांच्या निर्णय आणि निवडींमध्ये कशी हस्तक्षेप करीत आहे. संशोधकांच्या मते, जेव्हा आपण भुकेले असाल तेव्हा आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास टाळावे. कारण अशा अवस्थेत घेलेले निर्णय हे बहुतेक वेळेस योग्य नसतात. भूक लागल्यावर लोकांचे व्यक्तिमत्त्व बदलते. भुकेलेल्या लोक अल्पावधीतच निर्णयाबद्दल अधिक विचार करतात, असे लोक भुकेले असताना बहुधा चुकीचे निर्णय घेतात.

आपली प्रतिक्रिया द्या