डायव्हिंगमध्ये अनुजला कास्यपदक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या अनुज शहाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील डायव्हिंगमध्ये पुरुषांच्या एक मीटर प्रिंग बोर्ड प्रकारात कास्यपदक पटकावले. चुरशीने झालेल्या या स्पर्धेत त्याने सूर मारताना अप्रतिम कौशल्य आणि लवचिकता दाखवत महाराष्ट्राला कास्यपदक जिंकून दिले. अनुज शहाने आजपर्यंत कनिष्ठ व वरिष्ठ गटातील राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये भरघोस पदके जिंकली आहेत. तो मुंबई येथे तुषार गीते यांच्याकडे सराव करतो. अनुज हा बंगळुरू येथे क्लिनिकल सायकॉलॉजी या विषयात पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम शिकत आहे. शुक्रवारी त्याची परीक्षा आहे. मी जरी पदव्युत्तर पदवी घेत असलो तरीही माझ्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे. खेळामुळे माझी एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढतो. आपोआपच मला अभ्यासासाठी मानसिक बळही मिळते, असे अनुजने सांगितले.