मेलबर्नमध्ये गांधीजींचा पुतळा चोरीला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

येथील ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी सेंटरमधील महात्मा गांधी यांचा ब्राँझचा पुतळा चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. हिंदुस्थाननेही या घटनेची गंभीर दखल घेत ऑस्ट्रेलियन अधिकाऱयांकडे हा मुद्दा उपस्थित केला. आरोपींना पकडण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती हिंदुस्थानने केली आहे.