
ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये रोव्हिल उपनगरातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा 426 किलोग्राम वजनाचा कांस्य पुतळा चोरीला घेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भर वस्तीतून पुतळा कापून चोरीला गेल्याने हिंदुस्थानी नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. ऑस्ट्रेलिया इंडिया कम्युनिटी सेंटरच्या बाहेर हा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र, आता पुतळाच चोरीला गेल्याने उलट-सुलट चर्चांना उधान आलं असून तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
महात्मा गांधींचा कांस्य पुतळा दिल्ली येथील हिंदुस्थानी सांस्कृतीत संबंध परिषदेने (ICCR) ऑस्ट्रेलियाला भेट स्वरुपात दिला होता. 12 नोव्हेंबर 2021 रोजी ऑस्ट्रेलियाचे तत्कालीन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या हस्ते उद्घाटन करून पुतळ्याचे लोकार्पन करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर 24 तासांत पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. मात्र, आता थेट पुतळाच चोरून नेण्यात आला आहे. मेलबर्न पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना सोमवारी (2 फेब्रुवारी 2026) दुपारी 12.50 च्या सुमारास घडली आहे. तीन चोरट्यांनी पुतळा कापून नेला आहे. पुतळ्याचा आता फक्त पायाचा भाग बाकी राहिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
BREAKING: Bronze statue of Mahatma Gandhi stolen in Melbourne’s Rowville suburb.
Thieves used an angle grinder to cut it from its base at the Australian Indian Community Centre overnight on Jan 12, leaving only the feet behind.
Gifted by ICCR & unveiled by ex-PM Scott… pic.twitter.com/gKX09j8Yzg
— JIGNESH܁ᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠᅠ (@jignesh03011976) February 3, 2026
महात्मा गांधीजींचा पुतळा चोरीला गेल्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयसवाल यांनी ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. सदर प्रकरणाची माहिती घेत तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच पुतळा परत आणून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी असंही ते म्हणाले आहेत.





























































