
सामना ऑनलाईन। अहमदाबाद
गुजरातमधील कच्छ येथील खाडी परिसरातून पाच पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बीएसएफचे जवान गस्त घालत असताना खाडी परिसरात त्यांना पाच मच्छिमार दिसले. पण त्यांच्या देहबोलीवरून जवानांना संशय आला. यामुळे जवानांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी ते पाकिस्तानी नागरिक असल्याचे सांगितले. तसेच बोटीतून ते कच्छला आले असेही त्यांनी सांगितले. पण संपूर्ण खाडी परिसरात कुठेही बोट दिसत नसल्याने जवानांनी त्यांना अटक केली आहे.
तसेच या परिसरात अजून काही पाकिस्तानी नागरिक लपले आहेत का याचाही शोध घेण्यात येत आहे.


























































