
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपल्या सीक्सर प्लॅनमध्ये म्हणजे 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल केले आहेत. आतापर्यंत या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळायचा, पण आता कंपनीने त्यात वाढ केली असून दररोज 3जीबी डेटा मिळणार आहे. 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये अतिरिक्त डेटा ऑफर अंतर्गत दररोज 3 जीबी डेटा ही ऑफर 31 डिसेंबरपर्यंत लागू असणार आहे. 31 डिसेंबरनंतर मात्र ग्राहकांना पुन्हा 2 जीबी प्रतिदिन डेटा मिळेल. यानुसार 134 दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटाशिवाय ग्राहकांना मोफत व्हॉईस कॉलिंग (250 मिनिटे रोज लिमिट) आणि 100 एसएमएस दररोज मिळतील. बीएसएनएलने यावर्षी 666 रुपयांच्या प्लॅनमध्ये चौथ्यांदा बदल केले आहेत.



























































