
बीएसएनएलने ग्राहकांसाठी एक नवा प्रिपेड रिचार्ज प्लान लॉन्च केला आहे. 1498 रुपयांचा हा प्लान असून याची वैधता 365 दिवस अर्थात वर्षभरासाठी आहे.
बीएसएनएलच्या 1498 रुपयांच्या प्लानमध्ये ग्राहकांना दिवसाला 2जीबी इंटरनेट डाटा मिळणार आहे. या प्लानची वैधता एका वर्षाची असून दिवसाचा इंटरनेट डाटा संपल्यावर ग्राहक 40kbps च्या गतीने इंटरनेटवर सर्फिंग करू शकतात. बीएसएनएलचा हा प्लान जवळपास सर्वत्र उपलब्ध असणार आहे.
दरम्यान, ज्या लोकांना वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो आणि ज्या लोकांना दिर्घकाळ इंटरनेटचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी बीएसएनएलचा हा प्लान चांगला पर्याय आहे. मात्र हा फक्ट डाटा प्लान असून ग्राहकांना मोफत व्हाईस कॉलिंग आणि एसएमएस सेवा मिळत नाही.
येथून करा रिचार्ज
तुम्हाला हा प्लान घ्यायचा असेल तर बीएसएनएलच्या वेब-पोर्टल किंवा थेट दुकानामध्ये जावून 1498 रुपयांचा प्रिपेड रिचार्ज करू शकता. तसेच बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा 123 नंबरवर STVDATA1498 हा एसएमएच पाठवून रिचार्ज करू शकता.
447 रुपयांचा प्लान
बीएसएनएलचा एक 447 रुपयांचा प्लान असून ग्राहकांना 60 दिवसांच्या मर्यादेसाठी 100 जीबी डाटा याद्वारे मिळतो. कोणत्याही नेटवर्कला मोफत व्हाईस कॉलिंगची सेवा आणि दररोज 100 मोफत मेसेज पाठवण्याची सेवाही या प्लानद्वारे ग्राहकांना मिळते. तसेच मोफत बीएसएनएल ट्यून्स आणि इरोस नाऊ एंटरटेनमेंटची सेवाही याद्वारे मिळते.



























































