
सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) 5जी सेवा पुढील सहा महिन्यांमध्ये सुरू होणार आहे. बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रॉबर्ट रवी यांनी यासंदर्भात दिल्लीतील एआय समिटमध्ये माहिती दिली. त्यांनी सांगितले, की पुढील सहा महिन्यांमध्ये बीएसएनएलच्या 5जी सेवेचे दिल्लीत सॉफ्ट लाँच करण्यात येईल. दिल्लीतून 5जी सेवेची चाचणी आणि सुरूवात करण्यात येणार आहे.





























































