काय सांगता! फक्त 6 हजारात मिळताहेत हे पाच ‘बेस्ट’ फोन, जाणून घ्या

4283

तुम्ही बजेट फोन घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला 6 हजारांच्या आत येणाऱ्या 5 बेस्ट स्मार्टफोन बाबत माहिती देणार आहोत. हे फोन चांगलेच लोकप्रिय असून खिशाला परवडणारे आणि अँड्रॉइड मोबाईलची सर्व फीचर्स यात असल्याने यावर खरेदीसाठी उडी पडते. जाणून घेऊया…

1. Micromax Canvas XP 4G

images-12
सहा हजारांच्या आत किंमत असणारा हा दमदार फोन असून यात 5 इंचाचा डिस्प्ले, 2000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा मोबाईल 1GHz क्वाड कोर प्रोससेर सपोर्ट असून यात 3 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. मेमरी कार्डच्या सहाय्याने यात वाढही करता येते. फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा रियर आणि 2 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून याची किंमत 5 हजार 98 रुपये आहे.

2. Xolo Era 1X

716actxcxnl-_sx679_
5 इंचाचा डिस्प्ले, 2500 एमएएचची बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे. हा फोन 1.3GHz क्वाड कोर प्रोससेर सपोर्ट करतो. यात 8 जीबी मेमरी देण्यात आली असून ती 32 जीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 8 मेगापिक्सल रियर आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 5 हजार 149 रुपये आहे.

3. Redmi 5A

images-13
हा 4G VolTE फोन असून दोन सिमकार्ड वापरता येतात. फोनला 5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, तसेच मेमरी 64 जीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा आज 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 4 हजार 999 रुपये एवढी आहे.

4. Samsung Galaxy J3 Prime

images-14
या फोनला 5 इंचाचा डिस्प्ले आणि 2600 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. फोनमध्ये 1.50 जीबी रॅम देण्यात आली असून 16 जीबी स्टोरेज देण्यात आले आहे. मेमरी कार्डच्या मदतीने स्टोरेज 128 जीबी पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 5 मेगापिक्सल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनची किंमत 4 हजार 490 रुपये आहे.

5. Redmi 4A

images-15
या फोनमध्ये 5 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला असून 1.4 GHz क्वाड कोर प्रोससेर सपोर्ट करतो. सोबत 2 जीबी राम आणि 16 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. मेमरी कार्डच्या मदतीने मेमरी 128 जीबी पर्यंत वाढवता येते. यात 13 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याची किंमत 5 हजार 999 रुपये आहे.

(फोनच्या किंमती वेबसाईटवरून घेण्यात आल्या आहेत, फ्लिपकार्ट, अमेझॉन यासारख्या साईटवर त्या वेगवेगळ्या असू शकतात)

10 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत ‘हे’ पाच दमदार स्मार्टफोन, जाणून घ्या

आपली प्रतिक्रिया द्या