पुण्यात दुमजली इमारत कोसळली, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आठजणांना बाहेर काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पुणे

मुंढवा परिसरातील केशवनगर येथील नाल्यालगत असलेली एक दुमजली इमारत आज दुपारी अचानक कोसळली. घराच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली आठजण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्वांना जखमी अवस्थेत बाहेर काढले. या घटनेत तळमजल्यावरील गोठय़ातील तीन म्हशींचा मृत्यू झाला. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

कैलास भांडवलकर (६०), छाया भांडवलकर (२२), अरुणा भांडवलकर (४०), मुग्धा भांडवलकर (१), साक्षी शिखतल (१२), स्वरा शिखतल (३), आदित्य मोर्य (५), विनीता मोर्य (३०) अशी जखमींची नावे आहेत. या सर्वांना ढिगाऱ्याखालून काढून त्यांना केईएम, ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.