
भाजपच्या प्रदेश कार्यकारीणी सदस्य अॅड. विजय कोठारी यांनी घेतलेल्या महा जनआरोग्य शिबीरातील 25 हजार लाभार्थ्यापैकी 19 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी जळगावला रवाना करण्यात आले आहे.
कोठारी यांनी 25 हजार रुग्णांचे महा जनआरोग्य शिबीर 11 ऑगस्टला घेतले. त्यामध्ये तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी, औषधोपचार व चष्मे वाटप करुन ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याचे ठरविले होते. त्यानुसार 24 ऑगस्टला चिखली येथुन 19 रुग्णांची तुकडी जळगांव येथे हृदयरोग, मुतखडा, वॉल आणि डोळ्याच्या शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आली. यावेळी अंबिका अर्बनचे अध्यक्ष अॅड. विजय कोठारी, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीष गुप्त, शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, सचिव प्रेमराज भाला, श्रीराम नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष पंडीतराव देशमुख, भाजपा शहर अध्यक्ष सुरेंद्र पांडे, हनुमंत भवर, अजय कोठारी, कुणाल बोंद्रे, डॉ.सौरभ कोठारी उपस्थित होते.
यावेळी अॅड. विजय कोठारी म्हणाले की, जनआरोग्य महाशिबीरामध्ये तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांपैकी आजपर्यंत 10 रुग्णांवर शस्त्रक्रिया चिखली येथे पार पडली. तर शस्त्रक्रिया विनामुल्य गोदावरी फाऊंडेशनच्या जळगांव येथील रुग्णालयात करण्यात येणार आहे. त्यासाठी चिखली परिसरातील 19 रुग्ण रवाना करण्यात आले आहे. यापुढेही रुग्णांचे गट तयार करुन जळगांव येथे पाठविण्यात येणार आहे. यावेळी रुग्ण अब्दुल बशीर अब्दुल रहीमान, रजिका प्रविण, शेख युसुफ, संगीता वानखेडे, अमडापुर, हिराबाई दगदाळे भोगावती, भिमराव रगड, पुरुषोत्तम सोळंकी चांधई, ओंकार वाघ चांडोळ, अनिकेत काहरे, कोमल इगंळे, सार्थक पवार भोरसा भोरसी, लक्ष्मण दांदडे, सुलोचना सोळंकी आन्वी, नागोराव सपकाळ करतवाडी, यांना शस्त्रक्रियेसाठी जळगांव येथे रवाना करण्यात आले.


































































