बुलढाणा जिल्ह्यात 69 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, 13 रूग्णांची कोरोनावर मात

556

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 380 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 311 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 69 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 1 व रॅपिड टेस्टमधील 68 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 14 तर रॅपिड टेस्टमधील 297 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 311 अहवाल निगेटीव्ह आहेत. तसेच आज उपचारादरम्यान करवंड ता. चिखली येथील 40 वर्षीय पुरूष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

आज 13 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये मंगल गेट मलकापूर येथील 17, 48 व 27 वर्षीय पुरूष, 45 व 31 वर्षीय महिला, आळंद ता. मलकापूर येथील 19 वर्षीय महिला, बस स्थानकाजवळ खामगांव येथील 34 वर्षीय महिला, मखानीया मैदान खामगांव येथील 35 व 32 वर्षीय महिला, शेगांव रोड खामगांव येथील 18 वर्षीय महिला, आळसणा ता. शेगांव येथील 40 व 56 वर्षीय पुरूष आणि मलकापूर येथील 24 वर्षीय महिला रूग्णाचा समावेश आहे. तसेच आजपर्यंत 5339 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 285 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 285 आहे.

आज रोजी 35 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 5339 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 625 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 285 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 319 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 18 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या