Buldhana accident : खामगाव तालुक्यात कार अपघातात एक ठार, चार जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात शनिवारी पहाटे चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्कार्पिओ पलटी होवून एक जण जागीच ठार, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी ते बोरी – अडगाव रोडवर पहाटे 6 वाजताच्या दरम्यान घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एम एच 33.ए सी. 2366 ही स्कार्पिओ गाडी शेगावकडे जात होती. भरधाव वेगामुळे कारचालकाचे गाडीवरील अचानक नियंत्रण सुटल्याने गाडी आंबेटाकळी ते बोरी – अडगाव रोडवर पलटी झाली आहे. स्थानिक नागरिकांना माहिती मिळताच या अपघातातील जखमींना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते.

या अपघातात देवराव रावजी भंडारकर (वय – 55, रा. गडचिरोली) हे जागीच ठार झाले आहेत. यासह गाडीमधील कांता देवराव भंडारकर वय (वय – 50), जयदेव नामदेव नाकाडू (वय – 40), जयश्री राऊत (वय – 16), समृद्धी कोमलवार (वय – 6, सर्व रा. तळेगाव ता. कुरखेड, जिल्हा – गडचिरोली) हे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खामगाव येथील शासकीय सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रथमचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर केले आहे.