कंटेनर दुचाकीचा भीषण अपघात; आजी-आजोबासह नातू ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

बुलढाण्यात आयशर व टँकर या दोन वाहनांमध्ये बजाज एमएटी दुचाकी वाहन आल्याने विचित्र अपघात घडला. अपघातात आजी-आजोबासह नातू ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी 3 च्या सुमारास मेहकर तालुक्यातील डोणगाव मार्गावरील इंन्डेन पेट्रोलपंपाजवळ नागापूर टर्निंगवर घडली.

अकोला जिल्ह्यातील पातूर येथील चाळणीपुरा भागातील अब्दुल जब्बार अ. रज्जाक (65, आजोबा) हे आपधान्यातल्या मुलीच्या भेटीसाठी जमिलाबी जब्बारशि (55, आजी) तसेच नातू मोहम्मद साजिद (12) यांच्यासह बजाज एमएटी या दुचाकी वाहनाने पातूर येथून मंगरुळ नवघरे येथे जात होते.

डोणगाव कडून मेहकरकडे येत असलेल्या आयशर तसेच मेहकर कडून डोणगावकडे येत असलेल्या टँकर या दोन्ही वाहनांच्यामध्ये बजाज एमएटी हे दुचाकी वाहन अडकल्याने विचित्र अपघात झाला. या अपघातात दुचाकीचा चुराडा होवून आजी-आजोबासह नातू जागीच मुत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच डोणगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व मृतदेह मेहकर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या अपघातातील दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून याप्रकरणी पुढील कारवाई सुरु होती.