बुलढाणा: 450 कोरोना अहवाल ‘निगेटिव्ह’; तर 72 पॉझिटिव्ह

364

बुलढाणा जिल्ह्यात प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 522 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 450 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 72 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 43 व रॅपिड टेस्टमधील 29 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 66 तर रॅपिड टेस्टमधील 384 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 450 अहवाल निगेटीव्ह आहेत.

पॉझीटिव्ह आलेले अहवाल पुढीलप्रमाणे : देऊळगावराजा : 1, बालाजी मंदीराजवळ 1, बालाजी नगर 1, सावखेड भोई ता. देऊळगावराजा : 6, देऊळगावमही ता. देऊळगावराजा : 1, चांदुर बिस्वा ता. नांदुरा : 2, नांदुरा : 1, संभाजी नगर 3, महाराणा चौक 4, अर्बन कॉलनी 1, आयटीआय जवळ 1, तहसिल कार्यालय 1, लोणार : 7, दहीफळ ता. लोणार : 1, भानापूर ता. लोणार : 2, सुलतानूपर ता. लोणार : 6, खळेगांव ता. लोणार : 1, शेंदुर्जन ता. सिंदखेडराजा : 1, येसापूर ता. लोणार : 1, चिखली : 4, मलकापूर : शिवाजी नगर 1, खामगांव : जोशी नगर 2, राठी प्लॉट 1, सुटाळा बु 6, गांधी चौक 3, पोलीस वसाहत 4, सती पैâल 1, बुलढाणा : पाळणा घराजवळ राम नगर 2, जानेफळ ता. मेहकर 1, डोणगांव ता. मेहकर : 1, गोतमारा ता. मोताळा : 4 संशयीत व्यक्ती पॉझीटिव्ह आल्या आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात 72 रुग्ण आढळले आहे.

आज एका दिवसामध्ये सर्वात जास्त 106 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. ही आजअखेर एका दिवसात सुट्टी दिलेल्या रुग्णांची सर्वात जास्त संख्या आहे. सुट्टी देण्यात आलेले रुग्ण पुढीलप्रमाणे : निंभोरा ता. जळगांव जामोद : 2, माकोडी ता. मोताळा : 5, मलकापूर : उपजिल्हा रुग्णालय 1, देऊळगावमही ता. देऊळगावराजा : 2, वरवट बकाल ता. संग्रामपूर : 1, पातुर्डा ता. संग्रामपूर : 2, अंचरवाडी ता. चिखली : 1, मूळ पत्ता किन्ही ताठे ता. जाप्रâाबाद जि. जालना : 1, असोला ता. देऊळगावराजा : 4, लोणी गवळी ता. मेहकर : 11, घाटबोरी ता. मेहकर : 2, सवणा ता. चिखली : 13, मेहकर : 1, चिखली : 1, खामगांव : सती पैâल 2, सुलतानपूरा 2, रेखा प्लॉट 4, सिंधी कॉलनी 1, इंदिरा नगर 1, शितलामाता मंदीराजवळ 1, गौरक्षण रोड 3, उदासी मठ 1, जगदंबा रोड 1, मोची गल्ली 1, सराफा लाईन 1, देऊळगावराजा : शिवाजी नगर 4, शेगाव : आरोग्य कॉलनी 1, चांदुर बिस्वा ता. नांदुरा : 8, धानोरा खुर्द ता. नांदुरा : 5, सिंधी कॉलनी 4, केशव अर्बन बँकेजवळ 2, मारवाडी गल्ली 1, नागरजे भवनजवळ 1, जामा मस्जीदजवळ 2, विठ्ठल मंदीराजवळ 5, मिलींद नगर 3, डवंगेपुरा 1, राम मंदीरावजळ 3, वसाडी बु. ता. नांदुरा : 1. आजपर्यंत 11988 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1125 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण एकूण संख्या 1125 आहे.

शनिवारी 227 नमुने अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 11988 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 1840 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 1125 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 680 कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या