बुलढाणा – नऊ अहवाल ‘निगेटिव्ह’, तीन पॉझिटिव्ह; एकाला डिस्चार्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुलढाणा जिल्ह्यातून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 12 अहवाल आज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 9 अहवाल कोरोना निगेटीव्ह, तर 3 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये चांदुर बिस्वा (ता. नांदुरा) येथील आधीच्या कोरोनाबाधीत तरुणाच्या संपर्कातील 16 व 12 वर्षीय मुलींचा समावेश आहे. तसेच चिखली येथील 24 वर्षीय महिलेचा समावेश आहे. सदर महिलेचा मुंबई प्रवास इतिहास आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 880 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर एकूण 48 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे.

आज शेगांव येथील 35 वर्षीय एका कोरोनाबाधीत रूग्णाला वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे.  आतापर्यंत 27 कोरोनाबधीत रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 27 आहे.  सध्या रूग्णालयात 18 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

‘कोरोना फक्त ट्रेलर, पिक्चर अभी बाकी है’, वुहान लॅबमधील ‘बॅट वूमन’ शी झेंगलींचे खळबळजनक विधान

तसेच आज 26 मे रोजी 12 अहवाल प्राप्त झाले आहेत. तसेच आज रोजी अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने 59 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 880 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.