बुलढाणा जिल्हा पतसंस्था फेडरेशन पूरग्रस्त 5 गावांचे पुनर्वसन करणार

2546

बुलढाणा जिल्हा नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थांचा संघ, बुलढाणाच्या वतीने सांगली जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे वाताहत झालेल्या सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील पाच गावे पुनर्वसनासाठी घेणार आहे, असे फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी जाहीर केले आहे.

यावर्षीच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रात संकट आले त्यामुळे मोठी हानी झाली आहे. या आपत्तीतून सावरण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न सुरू आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्था व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्थांचा संघ (फेडरेशन), बुलढाणा यांनी तातडीची सभा घेऊन या विषयावर चर्चा करण्यात आली. जिल्हा फेडरेशन व राज्य फेडरेशनच्यावतीने सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बेलवडी, वसन्डे, ब्रह्मनाळ, बुरजी व खटाव ही पाच गावे पुनर्वसनासाठी घेण्याचे ठरले आहे. पुनर्वसनचे हे काम 2-3 दिवसात राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांचे मार्गदर्शनात सुरु करण्यात येणार आहे. या कामात जास्तीतजास्त पतसंस्थांनी सहभाग नोंदवावा व जास्तीतजास्त रोख स्वरुपात मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे. या मदतीची रक्कम महाराष्ट्र राज्य फेडरेशन किंवा बुलढाणा जिल्हा नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी संस्थांचे फेडरेशन, बुलढाणा यांचेकडे पाठवावी असे आवहन बुलढाणा जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी केले आहे. या सभेस जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष राधेश्याम चांडक, उपाध्यक्षा डॉ. स्वाती वाकेकर, मानद सचिव सुरेद्र पांडे व संचालक अ‍ॅड. मंगेश व्यवहारे, देवानंद कायंदे, पंडीतराव देशमुख, शाम नसवाले, गोविंद मापारी आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या