
राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 27 जुलैचा वाढदिवस साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करा असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना आमदार, माजी आमदार, जिल्हा प्रमुख, सहसंपर्क प्रमुख, महिला आघाडी, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख ,शहरप्रमुख व शिवसेना, युवा सेना पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातून 1400 क्विंटल धान्य व किराणा (गहू, तांदूळ, पीठ, तेल, मीठ) जमा केले. आज मेहकर येथून 13 बसेसमधून हे धान्य व किराणा पूरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आले.

यावेळी खासदार जाधव म्हणाले की, ही मदत नाही तर शिवसेनेचे कर्तव्य आहे. आम्ही ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करतो. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हे जिल्हा शिवसेनेचे कार्य आहे. याप्रसंगी शिवसेना आमदार संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, सहसंपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, कृषी सभापती राजेंद्र पळसकर,महिला आघाडी जिल्हा प्रमुख आशाताई झोरे, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी ऋषी जाधव, किसान सेनेचे लखन गाडेकर, तालुका प्रमुख शिवप्रसाद ठाकरे, बाळासाहेब नारखेडे, तालुका प्रमुख सुरेश वाळूकर, उपनगराध्यक्ष तथा शहरप्रमुख जयचंद बाठीया, माजी उपजिल्हा प्रमुख दिलीपबापू देशमुख, अजय उमाळकर, नंदू कऱ्हाडे, उप तालुका प्रमुख संजय पाटील, ओमसिंग राजपूत, युवा सेना तालुका प्रमुख भुषण घोडे, भास्कर राऊत ,दुर्गाप्रसाद रहाटे ,कामगार सेनेचे संजय मापारी सह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक हजर होते.




























































