बुलढाण्यात आणखी 15 कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, रुग्ण संख्या 198 वर

1037

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 65 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 50 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये धामणगांव बढे ता. मोताळा येथील 75 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगी, 47 वर्षीय महिला व 42 वर्षीय महिला रूग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. अशाप्रकारे धा. बढे येथे 6 रूग्ण आढळले आहे. तसेच  मोहनपुरा मलकापूर येथील 30 वर्षीय महिला, 17 वर्षीय तरूण, 37 वर्षीय पुरूष, 35 वर्षीय पुरूष संशयीत रूग्ण पॉझीटीव्ह आले आहे. तसेच मलकापूर येथील 45 वर्षीय पुरूष, मँगो हॉटेल, मेहकर येथील 22 वर्षीय पुरूष, घासलेटपुरा नांदुरा येथील 6 वर्षीय मुलगा, 43 वर्षीय पुरूष व दाल फैल खामगांव येथील 75 वर्षीय वृद्ध पुरूष रूग्णाचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. अशाप्रकारे 15 अहवाल पॉझीटीव्ह प्राप्त झाले आहे.

आज 1 रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे त्याला वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामध्ये चाळीस बिघा मलकापूर येथील 60 वर्षीय पुरूष रूग्णाचा समावेश आहे.  तसेच आजपर्यंत 2418 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 139 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 139 आहे.  तसेच आज 27 जुन रोजी 68 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 15 पॉझीटीव्ह, तर 50 निगेटीव्ह आहेत.  आज रोजी 101 अहवालाच्या प्रतिक्षेत असलेले नमुने  आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 2418 आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 198 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 139 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या  रूग्णालयात 48 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 11 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या