
नगर महापालिकेच्या बुरुडगाव कचरा डेपोला 24 एप्रिल रोजी पहाटे 1.30च्या सुमारास आग लागली. आज दहा दिवस उलटूनही ही आग धुमसतीच आहे. या ठिकाणी लागलेल्या आगीचा धूर इतक्या प्रचंड प्रमाणात आहे की, तब्बल 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बाबुर्डी घुमट येथूनदेखील हा धूर दिसत आहे. हा विषारी धूर आसपासच्या भागात, नगर शहराच्या वातावरणात पसरत चालला आहे.
नगर शहरात कचरा संकलन करून त्याचे विलीनीकरण करण्यासाठी उपलब्ध कचरा डेपोपैकी सर्वात मोठा प्रकल्प शहरापासून 7 किलोमीटर दूर बुरुडगाव येथे आहे. साधारण गेल्या तीन वर्षांपासून त्याठिकाणी प्रकल्प चालू आहे. मात्र, रोज शहरातून घंटागाडीमध्ये ज्याप्रकारे ओला व सुका कचरा एकत्रितपणे गोळा केला जातो, त्यावरूनच कचरा व्यवस्थापनामध्ये महापालिका उदासीन असल्याचे दिसून येते. याउलट शहरातील उपनगर भागात विविध ठिकाणी प्लॅस्टिक, कचरा ढीग करून सर्रासपणे रोज जाळला जात आहे. अशा परिस्थितीत बुरुडगाव कचरा डेपो येथे गेल्या कित्येक वर्षांपासून साठवलेले तब्बल 25 ते 30 फूट उंचीचे व शेकडो चौरस मीटर लांब कचऱयाचे ढीग साचले आहेत. त्याचे पूर्णतः रिसायकॊिलंग व विघटन करण्यात संबंधित कचरा व्यवस्थापन विभाग अपयशी ठरले आहे.
याआधीही सावेडी कचरा डेपोला वारंवार आगी लागल्या होत्या. त्यातून कोणताच धडा, प्रतिबंधात्मक सुधारणा, योग्य कारवाई व शास्त्र्ााsक्त उपाययोजना महापालिकेकडून बुरुडगाव कचरा डेपोत झालेल्या दिसून येत नाहीत. आग लागण्याची शक्यता असतानादेखील इतक्या मोठय़ा प्रमाणात कचरा अशास्त्र्ााrयरीत्या का साठवला गेला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर आग प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, हे या आगीतून सिद्ध होते.
चौकशी करून जबाबदार लोकांवर कारवाई करावी
या आगीमुळे पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे प्रचंड नुकसान होत आहे. अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न असूनही गेल्या 10 दिवसांपासून सुरूच असलेली आग अजून पुढील किमान महिनाभर आटोक्यात येणे शक्य वाटत नाही. मात्र, या कचरा डेपो आग प्रकरणाची चौकशी करून जबाबदार प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहभागी लोकांवर कायदेशीर कारवाई करावी व शहरात अशी दुर्दैवी आणीबाणीची परिस्थिती पुन्हा कधीही उद्भवू नये म्हणून कचरा व्यवस्थापन विभागाने व महापालिकेने बोध घेऊन कचरा विघटन व रिसायकॊिलंगविषयक कायमस्वरूपी उपाययोजना तत्काळ करावी, अशी कळकळीची मागणी नगर एन्व्हायर्नमेंट, नगर ट्रेकर्स फाउंडेशन व नगर बर्डींग पाल्स या संस्थांकडून करण्यात आली आहे.
पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी ठोस उपाययोजना नाहीत
नगर शहरात एकीकडे आपण वातावरण बदल रोखण्यासाठी ‘आझादी का अमृत महोत्सव, स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण मिशन,’ इत्यादीअंतर्गत विविध पर्यावरणासाठी उपक्रम व विविध कार्यक्रम आयोजित करतो. मात्र, शहराचे विस्तारीकरण व वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत महापालिका प्रशासनाकडून पर्यावरण रक्षण व संवर्धन क्षेत्रात प्रत्यक्ष जमीनस्तरावर महत्त्वपूर्ण ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत.
धुरातील वायू, रसायने आरोग्यासाठी हानिकारक
या आगीमध्ये जळणारा कचरा प्लॅस्टिक, कागद, कपडे आदी स्वरूपात आहे. असा कचरा जेव्हा जाळला जातो, त्यावेळी येथे निघणाऱया धुरामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साइड, सल्फर डाइआक्साइड, हायड्रोजन साइनाइड इत्यादी हानिकारक वायू त्याचबरोबर जड धातू, डायोक्साईन्स, फ्युरान्स, पार्टीक्युलेट्स इत्यादी अत्यंत हानिकारक रसायने मोठय़ा प्रमाणात या आगीमधून तयार होत असतात. अशा केमिकल्सचा मानवी आरोग्यावर अत्यंत विपरीत परिणाम होऊ शकतो. या भागात निर्माण झालेल्या सल्फर डायआक्साइड व नायट्रोजन ऑक्साइड या वायूंमुळे ‘ऍसिड रेन’देखील संभवू शकते. तसेच कचरा जळताना निघणारे वायू वातावरणामध्ये दीर्घकाळ राहतात. सूक्ष्मजीव, वन्यजीव, वनस्पती, झाडे यांचे जीवन व्यथित करतात.
गेल्या 10 दिवसांपासून या धुराचा आम्हाला प्रचंड त्रास होतो आहे. धुरामुळे मोठय़ा प्रमाणात खोकला येत आहे. घरातील मुले व ज्येष्ठ मंडळींना सुरक्षित ठिकाणी स्वखर्चाने हलविण्यात आले आहे. आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शेतीतील पिकांवरदेखील वारंवार कीड पडत आहे
– उद्धव कुलाटे, ग्रामस्थ, बुरुडगाव.
नगर शहरात ‘सिंगल युज प्लॅस्टिक’चे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या कचऱयातून प्लॅस्टिकचे डोंगर तयार होत आहेत. त्यावर लागलेला वणवा पहावा लागत असून, हे अत्यंत दुर्दैवी आहे. याचे अत्यंत गंभीर परिणाम पुढील कित्येक दशके आपल्या सर्वांना व निसर्गातील प्रत्येक घटकाला भेडसावणार आहेत. वातावरण बदलाची तीव्र समस्यादेखील आपण ओढावून घेणार आहोत.
– अमित गायकवाड, पर्यावरण कार्यकर्ते.



























































