बँकॉकमध्ये बस आणि ट्रेनची टक्कर; ८ जणांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

थायलंडची राजधानी बँकॉक येथे शनिवारी दुपारी एक भीषण अपघात घडला असून, यामध्ये एका बस आणि ट्रेनची जोरदार टक्कर झाली. या दुर्घटनेत ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने स्थानिक प्रसारमाध्यमांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात बँकॉकच्या रत्चाथेवी जिल्ह्यातील एका रेल्वे क्रॉसिंगवर झाला. बस आणि ट्रेनची धडक इतकी भीषण होती की, टक्कर झाल्यानंतर अचानक मोठा स्फोट झाला आणि आग लागली. या अपघात अनेक कार आणि मोटारसायकलींचेही मोठे नुकसान झाले आहे.

२० हून अधिक जण जखमी

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या भीषण अपघातात २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझवण्याचे आणि जखमींना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.