गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘बटरफ्लाय’

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार विभागासाठी महाराष्ट्र शासनाकडून मीरा वेलणकर दिग्दर्शित ‘बटरफ्लाय’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. महोत्सवात 22 नोव्हेंबरला चित्रपट दाखविण्यात येणार असून त्याआधी या चित्रपटाचा विशेष शो एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा यांनी 21 नोव्हेंबरला रवींद्र भवन, मार्ग येथे संध्याकाळी 7 वाजता आयोजित केला आहे.

इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया आणि फिल्म बाजार या दोन्ही ठिकाणी दाखवला जाणारा ‘बटरफ्लाय’ एकमेव मराठी चित्रपट आहे. यावेळी चित्रपटाचे निर्माते आणि अभिनेता अभिजीत साटम, अभिनेत्री मधुरा वेलणकर-साटम, दिग्दर्शिका मीरा वेलणकर आणि महेश मांजरेकर उपस्थित राहणार आहेत. प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी कौतुक केलेला हा चित्रपट स्वप्नपूर्ती साठी धडपडणाऱ्या प्रत्येकाने पहायला हवा.