
निवडणूक आयोगाने मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशान नागालँड मणिपूरसह 12 राज्यातील 57 जागांच्या पोटनिवडणुकांची घोषणा केली आहे. 56 विधानसभा तर एक लोकसभेच्या जागेवर या पोटनिवडणुका होणार आहे. 3 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी आणि निकाल असणार आहे. केरळ, आसाम, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालच्या 7 जागांवर पोटनिवडणुका होणार नाहियेत.
Schedule for Bye-Election to fill casual vacancy in the Parliamentary Constituency of Bihar and Legislative Assemblies of various States https://t.co/e678s8Ipel
— Sheyphali Sharan (@SpokespersonECI) September 29, 2020
ज्या भागात पोटनिवडणुका होणार नाहीत त्या भागात निवडणूक घेऊ नये अशा सूचना आम्हाला मिळाल्या म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. केरळ विधानसभेचा कार्यकाल 24 मे, तमिळनाडू विधानसभेचा कार्यकाल 30 मे तर आसाम विधानसभेचा कार्यकाल 31 मे 2021 रोजी संपणार आहे.
सर्वाधिक जागा मध्य प्रदेशमध्ये असून तिथे 27 जागांवर पोटनिवडणूका होणार आहेत. ही पोटनिवडणूक अतिशय महत्त्वाची असून अटीतटीची असणार आहे, कारण या पोटनिवडणुकीच्या निकालांवर मध्य प्रदेशमधील भाजपचे सरकार अवलंबून आहे.
त्यानंतर गुजरातमधील 8 जागा, असून उत्तर प्रदेशच्या 7, झारखंड, मणिपूर, नागालँड, ओडिशा आणि कर्नाटकाच्या प्रत्येकी दोन जागा असून तेलंगाणा आणि छत्तीसगडच्या प्रत्येकी एक जागांवर पोटनिवडणूक होणार आहे.




























































