मुंबई : भायखळा येथे केबल ब्रिज, एमआरआयडीसीची योजना

688

भायखळा येथे रेल्वे मार्गावर नवा केबल स्टेअड ब्रिज बांधण्याची महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पारेशनने (एमआरआयडीसी) आखली आहे. तेथे असलेल्या 98 वर्षे जुन्या ब्रिटिशकालिन उड्डाणपुलाला न हटविता त्याच्या वरून हा नवा आधुनिक पूल जाणार आहे.

भायखळ्याच्या उड्डाण पुलासह शहरातील 11 धोकादायक उड्डाण पूल आणि 1 रोड अंडर ब्रिज बांधण्यासाठी पालिकेशी 14जुलै रोजी एमआरआयडीसीने करार केला आहे. सीएसएमटी आणि दादरला जोडणाऱ्या भायखळ्याच्या या पुलावरील वाहतूक खोळंबून शहरात समस्या निर्माण होऊ नये म्हणून जुन्या पुलावरील वाहतूक चालूच ठेवून त्याच्यावरून त्याचवेळी नवा केबल स्टेएड ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाने बांधण्यात येईल आणि तो बांधून पूर्ण झाल्यानंतर जुन्या उड्डाण पुलाची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. सध्याचा ब्रिटिशकालिन पूल सहा लेनचा आहे. हा नवा केबल स्टेअड ब्रिज आठ पदरी असणार असून चार लेन डावीकडे तर चार लेन उजवीकडे असणार आहेत. तर जुन्या पुलाचा ‘व्हायडक्ट’ नव्या पुलाच्या आयकॉनिक स्ट्रक्चरशी जुळविण्यात येणार आहे. त्याला केबलचा आधार देण्यात येणार असून त्यानंतर केबल आधारित पूल संपूर्ण बांधल्यानंतर जुन्या सहा पदरी पुलाचे पुनर्विकास करण्यात येऊन त्याच्या सहा लेनच्या शेजारी आणखीन चार लेन बांधण्यात येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या