मध्य रेल्वेच्या भायखळा मेकॅनिकल इन्स्टिटय़ूटवर भगवा फडकला, रेल कामगार सेनेचा दणदणीत विजय

Byculla Mechanical Institute Rail Kamgar Sena Sweeps Central Railway Election

मध्य रेल्वेच्या भायखळा मेकॅनिकल इन्स्टिटय़ूटच्या निवडणुकीत शिवसेनेच्या रेल कामगार सेनेने दणदणीत विजय मिळवून इन्स्टिटय़ूटवर भगवा फडकवला. इन्स्टिटय़ूटच्या नऊ जागांसाठी निवडणूक झाली. त्या सर्व नऊ जागांवर रेल कामगार सेनेचे उमेदवार भरघोस मतांनी विजयी झाले आणि विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडाला. या विजयाने रेल कामगार सेनेचा मध्य रेल्वेच्या कामगार क्षेत्रातील दबदबा आणखीन वाढला आहे.

रेल कामगार सेनेचे अध्यक्ष, माजी खासदार विनायक राऊत यांच्या आदेशानुसार कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव (बाबी) यांच्या नेतृत्वाखाली मध्य रेल्वे मुंबई विभागातील भायखळा, दादर, परळ, कुर्ला, ठाणे, कल्याण येथील मेकॅनिकल इन्स्टिटय़ूटच्या निवडणुका पार पाडल्या. या निवडणुकीत भायखळा इन्स्टिटय़ूटमध्ये रेल कामगार सेनापुरस्कृत स्वतंत्र पॅनेल रिंगणात उतरले होते. या पॅनलने विरोधी पॅनेलवर भरघोस मतांनी मात करीत प्रचंड मोठा विजय मिळवला.

निवडणुकीत सचिव म्हणून नरेंद्र तळेकर, खजिनदार म्हणून उदयकुमार वाघे, तर सदस्य म्हणून राजेंद्र काटकर, मिलिंद झिंगे, विकास पाटील, प्रशांत बागवे, मोइनुद्दीन खान, नरेंद्र परसोया आणि गणेश सावंत हे भरघोस मतांनी निवडून आले. हा विजय संपादन करण्यासाठी योगेश जाधव, भारत शर्मा, नरेश बुरघाटे, प्रशांत कमानकर, संतोष गावडे, चंद्रकांत म्हस्के, सुरेश परदेशी, चंद्रकांत विनरकर, तुकाराम कोरडे, कृष्णा रनशूर, किशोर सोनवणे, दिलीप पाटील, अतुल राणे, कन्हैयालाल थारवानी, प्रतीक गायकर, वैभव इंदुलकर, नीलेश कदम, योगेश भोईर, नितीन तुळसकर, गणेश इंदुलकर, नितीन कदम, विरेन शर्मा, संदीप गिम्हवनेकर, संतोष देवळेकर, राजू पवार, चेतन सालवे, प्रदीप राजवडकर, जितेंद्र बोरिचंद, सिद्धार्थ नवघिरे, बंटी बल्लाल, अनिल साटम, अमोल जगताप, राजेश कोकाटे, प्रिया ढगे, सलीम शेख आदी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली.