आम्ही या देशावर 800 वर्षे राज्य केले, आणखी काय पुरावा हवा; ओवैसीचे फुत्कार

3269
akbaruddin-owaisi

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. सोमवारी हैदराबादमध्ये एका सभेला संबोधित करताना अकबरुद्दीन ओवैसी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. जे लोक कागद पाहण्यासाठी तुमच्या घरी येतील त्यांना सांगा की आम्ही या देशावर 800 वर्षे राज्य केलेले आहे. त्यामुळे आणखी काय पुरावा हवा, असे विधान अकबरुद्दीन ओवैसी यांनी केले.

CAA-NRC विरोधात शहांनी उघडला मोर्चा; मोदींवर टीका, अनुपम खेर यांना म्हणाले ‘जोकर’

नागरिकांना संबोधित करताना अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले की, कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. जे लोक विचारत आहेत की मुसलमानांकडे काय आहे, मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला माझे कादगपत्र पाहायची असतील, परंतु आम्ही 800 वर्षे या देशावर राज्य केले आहे. हा देश आमचा होता, आहे आणि राहील. माझ्या पूर्वजांनी या देशाला चारमीनार दिला, कुतुब मीनार दिला, जामा मशिद दिली. हिंदुस्थानचे पंतप्रधान ज्या लाल किल्ल्यावरून झेंडा फडकावतात तो देखील आमच्या पूर्वजांनी या देशाला दिला आहे, असेही ते म्हणाले.

akbaruddin-owaisi-2

ते पुढे म्हणाले, नागरिकत्व सुधारणा कायद्याचा हवाला देऊन कोणी तुमच्याकडे कागदपत्र मागितली तर त्याला सांगा की कागदपत्र काय मागतोस तो जो चारमीनार उभा आहे तो माझ्या बाप-जाद्यांनी बनवला आहे, तुमच्या बापांने नाही बनवला. दरम्यान, वादग्रस्त विधान करण्याची अकबरुद्दीन ओवैसी यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील त्यांनी हिंदूंविरोधात आणि मोदींविरोधात विखारी फुत्कार सोडले होते.

आपली प्रतिक्रिया द्या