CAA-NRC विरोधात शहांनी उघडला मोर्चा; मोदींवर टीका, अनुपम खेर यांना म्हणाले ‘जोकर’

5319

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि नागरिकत्व नोंदणी कायदा (एनआरसी) विरोधात देशभरात आंदोलन सुरु असतानाच बॉलिवूड सेलिब्रिटींनीही यात उडी घेतली. मुंबई-दिल्लीत झालेल्या आंदोलनात अनुराग कश्यप, तापसी पन्नू, स्वरा भास्कर, ऋचा चड्ढा, अली फजल, फरहान अख्तर यासारख्या बॉलिवूडकरांनी सहभाग नोंदवला. बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोण हिने थेट जेएनयू गाठत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हजेरी लावली. आता ज्येष्ठ अभिनेते नसरुद्दीन शहा यांनीही याबाबत आपले मत व्यक्त केले आहे.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये नसरुद्दीन शहा यांनी सीएए आणि एनआरसीवर आपली भूमिका व्यक्त करताना म्हटले की, ‘स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही लोकांना या देशाचे नागरीक आहे हे सिद्ध करावे लागत असेल तर हे चुकीचे आहे. सध्या तरी मी इतकेच सांगू इच्छितो की मी कोणाला घाबरलेलो नाही, तसेच मी चिंताग्रस्तही नाही, मात्र मला खूप राग आलेला आहे’, असेही ते म्हणाले.

स्वतःच निर्माण केलेल्या NRC च्या विरोधात माजी मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयात

ते पुढे म्हणाले की, मी ट्विटरवर नाही. परंतु जे लोक ट्विटरवर आहेत, मला त्यांच्याकडून ही अपेक्षा आहे की त्या लोकांनी कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा याबाबत विचार केला असेल. अनुपम खेर या बाबतीत खुप अग्रेसिव्ह आहेत, मात्र मला नाही वाटत त्यांना जास्त गंभीरतेने घ्यायला हवे. ते एक विदुषक, मनोरुग्ण आहेत. हा त्यांच्या रक्तातील गुण आहे. परंतु जे लोक याचे समर्थन करत आहेत त्यांना आता निर्णय घ्यावा लागेल की आपण कोणाला पाठिंबा देतोय, असेही नसरुद्दीन शहा म्हणाले.

चित्रपट क्षेत्रातील दिग्दर्शक आणि अभिनेते या कायद्याविरोधात उभे राहिले आहेत. परंतु अनेक सुपरस्टार याबाबत भूमिका घ्यायला घाबरत आहेत, कारण त्यांच्याकडे गमावण्यासारखे खूप काही आहे. दीपिकाकडेही गमावण्यासारखे खूप काही होते, मात्र तरीही तिने रिस्क घेतली आणि विद्यार्थ्यांसोबत उभी राहिली, असेही शहा म्हणाले. मोदींवर निशाणा साधताना शहा म्हणाले की, ते कधी स्वत: विद्यार्थी नव्हतेच, त्यामुळे मोदी विद्यार्थी आणि बुद्धीवाद्यांसोबत असंवेदनशीलतेना वागतात.

आपली प्रतिक्रिया द्या