
शुक्रवारी उत्तर प्रदेशात विविध ठिकाणांनी पढण्यात येणाऱ्या नमाजाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील 7 जिह्यांमध्ये इंटरनेट बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गाजियाबादसह अनेक जिह्यांमध्ये 24 तासांसाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव शुक्रवारी रात्री 10 वाजेपर्यंत इंटरनेट बंद ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, धर्मगुरूंनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. अफवांना लगाम घालण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने गाजियाबाद, सहारनपूर, बिजनौर, मुजफ्फराबाद, मथुरा आणि आग्रा याठीकाणी इंटरनेट बंद ठेवण्यात येणार आहे. मुजफ्फरनगरमध्ये 28 डीसेंबरपर्यंत इंटरनेट बंद ठेवण्यात येणार आहे. तर मेरठमध्ये गुरुवारी सायंकाळी 7 वाजल्यापासूनच इंटरनेट बंद ठेवण्यात येईल.
एक दिवसाचा रोजा ठेवण्याचे आवाहन
मुस्लिमांनी शांतता राखावी. एक दिवसाचा रोजा ठेवावा असे आवाहन रखनौचे मौलाना खालीद फरंगी महल यांनी केले आहे.देहरादूनच्या पलटन बाजारातील जामा मशीदीच्या इमामांनी संपुर्ण देशात शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
























































