
नागरिकत्व सुधारणा कायद्याला होणाऱ्या विरोधाचे पडसाद रविवारच्या हिंदुस्थान-श्रीलंका टी-20 सामन्यावरही पडणार आहेत. कारण, हा सामना पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांसाठी स्टेडिअममध्ये पोस्टरबंदी जाहीर करण्यात आली आहे.
आसाम क्रिकेट असोसिएशनचे चिटणीस देवाजीत सायकिया यांच्या म्हणण्यानुसार, सध्या #CAA वरून देशभरात आंदोलनांचं सत्र सुरू झालं आहे. ते हिंसक वळणावरही पोहोचलं आहे. पण,क्रिकेट हे वेगळं क्षेत्र आहे. हिंदुस्थान-श्रीलंका टी-20 सामन्यांचा नागरिकत्व सुधारणा कायद्याशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. तो एक संपूर्णतः वेगळा कार्यक्रम आहे. त्यामुळे सामन्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या सामन्यांवेळी पोस्टर झळकवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर 4 आणि 6 क्रमांक लिहिलेले चौकार-षटकाराचे प्लकार्ड्सही आणण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. सामन्या दरम्यान #CAA विरोधी पोस्टर झळकवून सामन्याच्या सुरक्षा
सामन्या दरम्यान कुणी #CAAविरोधात पोस्टर झळकावू नये यासाठी मार्कर पेन्स घेऊन जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पैशांचे पाकिट, पर्स, मोबाईल फोन्स आणि घर किंवा गाडीच्या किल्ल्या इतकंच सामान स्टेडिअममध्ये नेता येऊ शकेल. या सामन्यासाठी अतिरिक्त सुरक्षाही ठेवण्यात आली आहे.

























































