का धावतात ट्रेन उशिरा? कॅगने शोधले उत्तर

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत भारतीय रेल्वे २०१७-७८ या वर्षात अधिक उशिरा धावली. रेल्वेच्या अधिकृत आकडेवारीनुसार २०१७-१८ या वर्षात ३० टक्के गाड्या उशिरा धावल्या. एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ या काळत ७१.३९ टक्के मेल आणि एक्सप्रेस गाड्या वेळेत होत्या. २०१६-१७ या काळात ७६.६९ टक्के गाड्या वेळेत धावल्या होत्या. या आकडेवारीनुसार या वर्षी गाड्यांना उशिरा होण्याच्या प्रमाणात ५.३० टक्के वाढ झाली आहे.

हिंदुस्थानच्या लेखा आणि परिक्षा विभागाने या प्रकरणाचा उहापोह करण्याचा प्रयत्न केला तर काही गंभीर चुका समोर आल्या. केंद्र सरकारने स्थानकांच्या नुतनीकरण आणि विकासासाठी ज्या योजना आखल्या आहेत त्यात या चुका आढळल्या. ज्या स्थानकांवर रेल्वे गाड्यांसाठी पर्यायी जागाच उपलब्ध न झाल्याने या गाड्या विलंबाने धावत होत्या. पण या समस्या सोडवण्यासाठी सरकारकडून कुठलेच प्रयत्न झाले नसल्याचे कॅगने आपल्या अहवालात म्हटले आहे. मंगळवारी संसदेत कॅगचा अहवाल सादर केला गेला.

स्थानकांच्या विकास आणि नुतनीकरणासाठी ज्या योजना आखल्या गेल्या त्यात फक्त प्रवाशांच्या सुविधा आणि स्थानकांच्या सजावटींकडे लक्ष दिले गेले. या योजनांमध्ये गाड्यांच्या येण्या जाण्यात आणि त्यात निर्माण होणार्‍या अडथळ्यांना दूर करण्यासाठी कुठलीच तरतूद नाही. ऊलट प्रवाशांच्या सुविधेमध्ये गाड्यांची वेळ ही प्रमुख बाब आहे. ट्रॅक आणि फलाट मोकळे नसल्याने गाड्या उशिरा धावत असल्याचे कॅगने आपल्या अहवलात स्पष्ट केले आहे. तसेच अनेकवेळा २४ कोचच्या गाड्यांसाठी तितका मोठा फलाटच उपलब्ध नसल्याचेही या अहवालात सांगितले आहे.

वॉशिंग लाईन आणि यार्डात असलेल्या अपूर्‍या लाईन्स यासुद्धा गाड्या उशिरा धावण्याचे कारण नॅकने सांगितले आहे. कॅगने परिक्षणासाठी १० रेल्वे झोनमधी १५ स्थानकं निवडले होते, जे प्रवाशांची गर्दी सांभाळण्यात अधिक अपयशी आहेत. कमकुवत पायाभुत सुविधांमुळे रेल्वे गाड्यांना आजू बाजूच्या स्थानकांवर किंवा फलाटावर उभे राहावे लागते हे सुद्धा निरीक्षण कॅगने नोंदवले.