प्रसिद्ध सुलेखनकार राजन जगताप यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध सुलेखनकार, कलादिग्दर्शक, नेपथ्यकार राजन जगताप (63) यांचे मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. चेंबूर येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नाटय़परागचे आजी-माजी पदाधिकारी, नाटय़ चित्रपट माध्यम क्षेत्रातील चाहते उपस्थित होते.

मूळचे सातारचे असणारे राजन जगताप यांनी मुंबईच्या जे. जे. कला महाविद्यालयातून कमर्शियल आर्ट आणि टेक्सटाईल डिझाइनचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर ‘मार्मिक’साठी आर्टिस्ट म्हणून काम केले. ऐन उमेदीच्या काळात ते ‘नाटय़पराग’ या सेवाभावी संस्थेचे संस्थापक सदस्य होते. करी रोड विभागातील ‘रविकिरण’ या संस्थेच्या माध्यमातून नाटय़चळवळ, बालनाटय़ रंगभूमीशी ते जोडले गेले. परळमधल्या सोशल सर्व्हिस लीग शाळेत माफक दरात कलावर्ग चालवले.