
पतीला दारूचे व्यसन असल्याचा खोटा आरोप करणे, त्याला चारचौघात ‘दारुडा’ म्हणून हिणवणे आणि अपमानित करणे हे पत्नीचे पृत्य मानसिक छळच आहे, असा निर्वाळा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. याच आधारे न्यायालयाने खोटे आरोप करणाऱ्या पत्नीपासून पतीला घटस्फोट मंजूर केला.
अर्जदार पतीने वैवाहिक जीवन पुन्हा सुरू न करण्याचा निर्धार केला होता. असे असूनही त्याने घटस्फोटाच्या याचिकेला आव्हान दिले होते आणि पत्नीकडून करण्यात आलेल्या खोट्या आरोपांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले होते. त्याच्या अपिलाचा स्वीकार करीत न्यायमूर्ती विशाल धागत आणि न्यायमूर्ती अनुराधा शुक्ला यांच्या खंडपीठाने अपीलकर्त्याला घटस्फोट मंजूर केला. सामाजिक वर्तुळात पतीला ‘दारुडा’ म्हणत सतत थट्टा करण्याची पत्नीची वृत्ती एक गंभीर बाब आहे. पत्नीचे संबंधित पृत्य मानसिक क्रूरता आहे. या प्रकरणात वैवाहिक जबाबदाऱया टाळण्यासाठी पत्नीने पतीवर व्यसनाचा निराधार आरोप केला आहे. यामुळे पतीला सामाजिक पातळीवर अपमानाचा सामना करावा लागत आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. पत्नीच्या निराधार आरोपाच्या पृतीचा निश्चितच दाम्पत्याच्या भविष्यातील नातेसंबंधांवर मोठा परिणाम होत असल्याचेही न्यायालय म्हणाले.
नेमके प्रकरण काय?
वैवाहिक वाद झालेल्या दाम्पत्याचे 2004 मध्ये लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. तथापि, दोघे 2017 पासून वेगळे राहत आहेत. पत्नीने यापूर्वी पतीविरुद्ध घरगुती हिंसाचार संरक्षण कायद्याअंतर्गत याचिका केली होती. नंतर तो खटला बंद केला होता. पतीने 2018 मध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. पत्नी क्रूर वागत असल्याचा तसेच खोटे आरोप करीत असल्याचा दावा पतीने केला होता, मात्र नंतर पतीने माफी मागून तडजोड केली होती. पुढे 2021 मध्ये कुटुंब न्यायालयाने घटस्पह्टाची याचिका फेटाळली. पतीला दारूचे व्यसन असल्याचे निरीक्षण कुटुंब न्यायालयाने नोंदवले होते. तथापि, दारूच्या व्यसनाबाबत पत्नीने केलेला आरोप खोटा असल्याचे म्हणणे मांडत पतीने उच्च न्यायालयात अपील केले होते.
























































