मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीत ईव्हीएम स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याची आयोगाची कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचे मतदान अलीकडेच शांततेत पार पडले, परंतु आता इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) भाजपने छेडछाड केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यामुळे राज्यात वातावरण तापले आहे. काँग्रेसच्या या आरोपानंतर विविध मतदारसंघांचे ईव्हीएम ठेवलेल्या सागर येथील स्ट्राँग रूमचे सीसीटीव्ही कॅमेरे 30 नोव्हेंबर रोजी सवा तास बंद होते अशी कबुली निवडणूक आयोगाने दिली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने हे कॅमेरे बंद होते, असेही आयोगाने म्हटले आहे.

ईव्हीएम उशिरा पोहोचली, तहसीलदार निलंबित
मध्य प्रदेशचे भाजपचे गृहमंत्री भूपेंद्र सिंग यांचा खुराई हा विधानसभा मतदारसंघ आहे. मतदानानंतर सिंग यांच्या खुराई येथील मालकीच्या हॉटेलमध्ये ईव्हीएम नेण्यात आली. यानंतर ती सागर या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी पोहोचली. याप्रकरणी नायब तहसीलदारांना निलंबित करण्यात आले आहे.