रत्नागिरी शहरातील प्रभाग 9 मध्ये प्रचाराची रणधुमाळी; प्रचारफेरीला सुरुवात

रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीत आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभागनिहाय प्रचार मोहीम वेगवान केली आहे. प्रभाग क्रमांक ९-अ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार अक्षय संगम कांबळे आणि प्रभाग ९-ब मधील नगरसेविका पदाच्या उमेदवार नाझनीन युसुफ हकिम यांच्या संयुक्त प्रचारफेरीला बेलबाग बाजारपेठ परिसरातून रविवारी जोरदार प्रारंभ झाला.या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला,