
प्रस्तावित विद्युत सुधारणा विधेयक 2020 मुळे देशातील ऊर्जा क्षेत्रात खासगीकरण बोकाळणार आहे. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील वीज कंपन्यांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. त्यापाश्र्वभूमीवर केंद्र सरकारने वीज क्षेत्राचे खासगीकरण करणारे प्रस्तावित धोरणच रद्द करावे या मागणीसाठी आज राज्यभरातील वीज कर्मचारी-अधिकाऱ्यांनी निदर्शने केली. वीज क्षेत्रातील खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी देशपातळीवरील नॅशनल को- ऑर्डीनेशन कमिटी एम्प्लॉईज अँड इंजिनीयर असोसिएशनच्या आदेशानुसार आज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्वâर्स फेडरेशन, सबोर्डीनेट इंजिनीयर असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस या संघटनांनी महावितरण, महानिर्मिती आणि महापरेषण या तिन्ही वीज कंपन्यांचे मुख्यालय असलेल्या प्रकाशगड आणि प्रकाशगंगा समोर निदर्शने करत वीज क्षेत्रातील खासगीकरणाचे धोरण रद्द करण्याची मागणी केली.


























































